Sunday , July 26 2026
Breaking News

पोलिसाने केली पत्नीची निर्घृण हत्या; सौंदत्ती येथील घटना

Spread the love

 

सौंदत्ती : एका पोलिसाने स्वतःच्याच पतीने पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात उघडकीस आली. ही घटना सौंदत्ती येथील रामसाईट भागात घडली असून, मृत महिलेचे नाव काशम्मा नेल्लिकट्टी असे आहे. आरोपी पतीचे नाव संतोष कांबळे असून तो पोलीस पथकात (कॉन्स्टेबल) म्हणून कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आणि काशम्मा यांनी सुमारे 13 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. काशम्मा बस कंडक्टर म्हणून नोकरी करत होती. मात्र, संतोष याला तिच्यावर संशय होता. त्यामुळे तो सतत तिच्यावर अत्याचार करत असे, तसेच दैहिक छळ करत असे. संतोषच्या त्रासाला कंटाळून काशम्मा काही महिन्यांपूर्वी माहेरी गेली होती आणि नंतर तिने संवदत्ती डेपोमध्ये बदली करून घेतली होती.

यानंतर तिने बैलहोंगल न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने 5 एप्रिल 2025 रोजी घटस्फोट मंजूर केला होता. घटस्फोटानंतरही संतोष तिला फोनवरून शिवीगाळ आणि धमक्या देत होता. अखेर 13 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास, संतोष काशम्माच्या सौंदत्ती येथील भाड्याच्या घरात जाऊन तिच्याशी वाद घातला. संतोषने संतापाच्या भरात पत्नीचा गळा चिरून आणि पोटात तीन वार करून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
तीन दिवसांनी घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सध्या सौंदत्ती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरार आरोपी संतोष कांबळेचा शोध सुरु आहे. या घटनेने संवदत्ती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *