

खानापूर : लैला शुगर्सचे 2025-26 सालाचे गळीत हंगाम दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आज बुधवार दि. 22.10.2025 रोजी सुरू करण्यात आला.
लैला शुगर्स कारखान्याचे सन 2025-26 सालाच्या गळीत हंगामाला कारखान्याचे चेअरमन व खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर व कारखान्याचे संचालक व रयत बांधव यांच्या हस्ते ऊस केन कॅरिअरमध्ये घालून गळीत हंगामाला चालना देण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक श्री. चांगाप्पा निलजकर, श्री. विठ्ठल करंबळकर, तुकाराम हुंदरे, यलाप्पा तिरवीर, सुबराव पाटील, पुंडलीक गुरव, नारायण हलगेकर, राजाराम हलगेकर, बाळाप्पा पाटील, परशराम तोराळकर व कार्यकारी संचालक श्री. सदानंद पाटील, मलाप्पा मारिहाळ, प्रशांत लक्केबैलकर, राहुल आळवणी, शंकर पाटील, तानाजी गोरल, कुप्पटगिरी, बल्लोगा व दोडहोसुर गावाचे पंचमंडळी आणि शेतकरी बांधव कारखान्याचे सर्व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta