Sunday , July 26 2026
Breaking News

सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यतत्परतेमुळे ऐन दिवाळीत एक मोठा अनर्थ टळला!

Spread the love

 

बेळगाव : काल बुधवारी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांना बेळगाव बसवान गल्ली येथे उघड्यावर वीजेची तार पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकरते पद्मप्रसाद हुली (एच ई आर एफ) यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थितीची पाहणी करून सदर माहिती (के ई बी) कार्यालय आणि खडेबाजार पोलिस स्टेशनला कळवली. या नंतर संबंधित हेस्कॉम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोचून धोकादायक स्थितीतील ती विजेची तार तोडली. त्यामुळे दिवाळीत एक मोठा ऐन दिवाळीत एक मोठा अनर्थ टळला.
अशाच प्रकारच्या धोकादायक स्थितीतील उघड्यावरील विजेच्या तारा शहर उपनगरातील अनेक भागात आहेत. या धोकादायक विद्युततारांची वेळीच दखल घेऊन दुरुस्ती ‌आवश्यक आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *