

खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील मलप्रभा नदीत शुक्रवारी सायंकाळी बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय 18) या तरुणाचा मृतदेह अखेर आज रविवारी 26 रोजी सकाळी सापडला आहे.
शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश हा पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात ओढला जाऊन बुडाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर शनिवारी सकाळपासून खानापूर अग्निशामक दलाचे जवानांनी शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले. तसेच एचइआरएफ रेस्क्यू पथक तसेच स्थानिक युवकांनी मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू केले होते. मात्र दिवसभराच्या प्रयत्नांनंतरही शनिवारी संध्याकाळपर्यंत मृतदेह सापडला नव्हता. रविवारी सकाळी तो मृतदेह सापडला. मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला होता.
Belgaum Varta Belgaum Varta