
खानापूर : खानापूर तालुक्यातील सार्वजनिक समस्या निवारण करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली जनस्पंदन कार्यक्रम घ्यावा असे निवेदन तहसीलदार साहेबांना व तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर साहेबांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी शिवस्वराज जनकल्याण संघटनेचे उपाध्यक्ष चापगाव ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले, खजिनदार मुकुंदराव पाटील, ऍड अभिजीत सरदेसाई, सुनील पाटील, संदेश कोडचवाडकर, मिलिंद देसाई, भाऊ पाटील, हनुमंत पाटील, ऋतिक पाटील, यल्लाप्पा कदम आदि उपस्थित होते.
निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष रमेश धबाले म्हणाले, आपल्या खानापूर तालुक्यामध्ये विविध समस्याने तालुका व्यापलेला आहे. त्यासाठी आपण लवकरात लवकर जनस्पंदन कार्यक्रम हाती घ्यावा जेणेकरून तालुक्यातील विविध खात्यातील अधिकारी एका व्यासपीठावर येऊन एकत्रितरित्या लोकांच्या समस्यांचे निवारण होईल. उदाहरणार्थ अपुऱ्या बसेसची सुविधा, संध्या सुरक्षा योजना, विधवा पेन्शन योजना, उताऱ्यामधील त्रुटी, सरकारी ऑफिसमध्ये रेंगाळत पडलेली कामे, हॉस्पिटलमध्ये अपुरी असलेली सुविधा, इलेक्ट्रिकल करंट संदर्भातील समस्या, तालुक्यामधील रस्त्यांची दुरावस्था, ग्रामपंचायत मध्ये प्रलंबित असलेली कामे व आता सुरू केलेल्या पंच हमी योजना अशा विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्या संदर्भात निकालात काढण्यासाठी जनस्पंदन कार्यक्रमाची आवश्यकता आहे जेणेकरून वैयक्तिक कामासाठी सरकारी ऑफिसमध्ये चकरा मारण्याची गरज भासणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta