Saturday , November 7 2026
Breaking News

शहापुरात श्री काळभैरवनाथ जयंती निमित्त विशेष पुजा अभिषेक

Spread the love

 

बेळगाव : दिनांक १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने नाथ पै. चौक शहापूर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्ताने मंगळवार दिनांक ११ रोजी सायंकाळी चार वाजता होम, बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा, प्रसाद वाटप, सायंकाळी पाच वाजता दीपोत्सव भजन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्या भाविकांना काळभैरवनाथ जयंती निमित्त अभिषेक करायचा असल्यास त्यांनी मंदिराचे पुजारी 9901655450 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंदिराच्या ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *