Tuesday , December 9 2025
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दि. ६/११/२०२५ रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी आय.सी.एम्.आर- एन.आय.टी.एम् येथील सेक्शन ऑफिसर कावेरी मोहन कुंभार या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिक्षण समन्वयक सविता पवार यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुण्या सेक्शन ऑफिसर कावेरी मोहन कुंभार यांनी फीत सोडून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शाळेच्या जुन्या आठवणींबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, चिकित्सक बुद्धी वृद्धिंगत होण्यासाठी, समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन मोलाची भूमिका बजावते, स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशीच करा असा संदेश आपल्या मनोगतात सेक्शन ऑफिसर कावेरी कुंभार यांनी दिला.
प्रदर्शनासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी विषय मानवी शरीर, कचऱ्याची विल्हेवाट, पर्यावरण प्रदूषण, वाहतूक व्यवस्था, सेंद्रीय शेती, आरोग्य, स्मार्ट सिटी हे विषय होते.

परीक्षक म्हणून डी.एस्.मुतगेकर, प्रसाद सावंत, रुपाली हळदणकर, स्नेहल पोटे हे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार,विज्ञान शिक्षिका मंजुषा पाटील, श्वेता सुर्वेकर, स्नेहा कुप्पेकर, शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेळगावकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *