
खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल प्रिमीअम लीग ही राज्यस्तरावर खेळविली जाणारी स्पर्धा असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याला एक टीम आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या टीमचे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून ही टीम काल रात्री बेंगलोर येथे दाखल झाली आहे. टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फाउंडेशन खानापूर करत असून यावेळी ही टीम फायनल खेळेल व जिंकेल अशी आशा करूयात …
१ नोव्हेंबर पासून ही स्पर्धा चालू झाली असून “राजा शिवाजी बेळगाव” यांची पहिली मॅच धारवाड सोबत आज संध्याकाळी ६ वाजता बेंगलोर येथे होणार आहे…
आपले सर्व खेळाडू जोशात असून यावेळी फायनल खेळायचीच असा निर्धार करून बेंगलोरला पोचली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta