
खानापूर : खानापूर तालुक्यातील हलसाल येथे हत्तींच्या कळपाने भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. मागील दोन दिवसांपासून आठ ते दहा हत्तींचा कळप हलसाल येथील जमिनीत थैमान घालत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
आधीच दिवाळीपर्यंत पावसाने हजेरी लावल्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले होते, त्यातच उरलेसुरले भात हत्तींच्या कळपामुळे उध्वस्त झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. हलसाल येथील शेतकरी मारुती तांबुळकर यांच्या शेतात सुमारे आठ ते दहा हत्तींचा कळप शिरला आणि जवळपास 10 पोती भात पिकाचे नुकसान केले तर त्यांच्या शेतापासून जवळच असलेल्या पंकज पुंडलिक तांबुलकर यांच्या देखील शेतात शिरून हातात तोंडाला आलेले भात पीक तिच्या कल्पने उध्वस्त करून टाकले आहे. हत्ती शेतात शिरत आहेत त्याची कल्पना शेतकऱ्यांना येतात गावातील काही शेतकरी हत्तींना पांगविण्यासाठी फटाक्या घेऊन शेताकडे येत होते. मात्र 300 मीटर लांब असलेल्या शेतात हत्तींच्या कळपाने शेतकरी पोहोचण्याआधीच शिरूर भात पिकाचे नुकसान केले होते त्यामुळे तांबूलकर कुटुंबीय हवालदिल झाले आहे. वन विभागाने वन विभागाने तात्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta