
खानापूर : स्त्रियांना हवे तसे जगायला मिळणे म्हणजे खरे सक्षमीकरण नव्हे, तर महिलांची वैचारिक आणि बौद्धिक पात्रता वाढवणे म्हणजे खरे सक्षमीकरण होय, असे मत म. ए. समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी व्यक्त केले.

श्रमिक अभिवृद्धी जनजागृती संघाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून शिवानी पाटील बोलत होत्या. खानापूर येथील लोकोळी येथे सदर महिला मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकळी ग्रामपंचायत पीडिओ विजयालक्ष्मी उपस्थित होत्या. श्रमिक अभिवृद्धी जिल्हा संयोजक अँथोनी जॅकेप, यशवंत भांदुर्गे, संजय हुपरी, श्रमिक अभिवृद्धी कार्यकर्ता एल डी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या साधना पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. महिलांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत भांदुर्गे यांनी केले तर सूत्रसंचालन कीर्ती पाटील यांनी केले. आभार भाग्यश्री माने यांनी मानले.
संघाच्या महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta