Sunday , December 14 2025
Breaking News

असोगा रामलिंगेश्वर देवस्थानावरील प्रशासक हटविले, विश्वस्त समिती नेमणार

Spread the love

खानापूर (वार्ता) : असोगा (ता. खानापूर) जागृत देवस्थान श्री रामलिंगेश्वर देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारने प्रशासक नेमले होते. त्यामुळे असोगा गावच्या स्थानिक विश्वस्त समितीचा हक्क नव्हता. नुकताच बेळगांव जिल्ह्यातील 17 क श्रेणी देवस्थानावरील स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासंदर्भात सहायक आयुक्त हिंदू धर्मदाय विभागाच्यावतीने आदी सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
त्यानिमित्ताने येत्या 3 फेब्रुवारीच्या आत धर्मदाय विभागाच्यावतीने निर्धारीत केलेल्या अर्जाच्या नमुन्याप्रमाणे इच्छूक हिंदू धार्मिय व्यक्ती वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली, संबंधित देवस्थानावर विश्वास व आस्था आहे. जी व्यक्ती चरित्र्यवान अशा व्यक्तींना मंदिराच्या विश्वस्त कमिटीत सदस्य होण्यास अर्ज करता येतो.
तेव्हा असोगा (ता. खानापूर) येथील श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या विश्वस्त कमिटीच्या सदस्य पदी 9 जणांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये 4 सदस्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या असुन 5 सदस्यांच्या जागा सामान्य नागरिकासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.
या जागा खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये देवस्थान पुजारीसाठी एक जागा, परिशिष्ट जाती, परिशिष्ट जमातीसाठी एक जागा, महिलांसाठी दोन जागा, तर इतर चार सदस्य जागा अशा 9 सदस्याची विश्वस्त समितीची निवड लवकरच होणार आहे.
मंदिरावरील विश्वस्त समितीची निवड ही तीन वर्षांसाठी असून अर्ज करू इच्छिणार्‍यांनी निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, एससी, एसटी जागेसाठी जात प्रमाणपत्र, जोडणे बंधनकारक आहे.
असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंगेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मलप्रभा नदीच्या काठावर वसले आहे. त्यामुळे या मंदिराला अधिक महत्त्व आहे.
निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री रामलिंगेश्वर देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
या ठिकाणी कर्नाटकासह गोवा, महाराष्ट्र आदी राज्यातील पर्यटक मलप्रभा नदीच्या काठावर वसलेल्या श्री रामलिंगेश्वर देवस्थानाला भेट देतात. याशिवाय महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक याठिकाणी उपस्थिती दर्शवितात.
आता या देवस्थानावर स्थानिक विश्वस्त समितीची निवड होणार त्यामुळे देवस्थानाला अधिक महत्व येणार आहे. शिवाय देवस्थानाची सुधारणाही होणार. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनतेतून समाधान पसरले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!

Spread the love  बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *