Sunday , December 7 2025
Breaking News

मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक : खानापूर तालुका समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी

Spread the love

 

युवा स्पोर्ट्स हलशीवाडीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न

खानापूर : शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत यासाठी शिक्षकांबरोबरच शाळा सुधारणा कमिटीने महत्त्वाची भूमिका बजावणी गरजेचे असून इंग्रजीतून शिक्षण घेतले तरच यशस्वी होता येते हा न्यूनगंड बाजूला ठेवून मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

युवा स्पोर्ट्स हलशीवाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम हलशी येथील सरकारी आदर्श मराठी शाळेच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विशाल गुरव होते. प्रारंभी आबासाहेब दळवी, माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई, मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील, गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई, नरसेवाडी येथील शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दळवी यांनी खानापूर तालुक्यातील सर्व मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात होती अनेक प्रकारच्या सुविधा नसताना देखील विद्यार्थी कष्टाने शिक्षण घेत होते. मात्र अलीकडच्या काही वर्षात पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढल्याने मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. मात्र पुन्हा एकदा मराठी शाळांना उर्जितावस्था उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी आणि शाळा सुधारणा कमिटीने सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक असून शिक्षकांनी शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे उपक्रम राबविल्यास त्याचा चांगला संदेश पालकांमध्ये जाईल त्यामुळे शिक्षकांनी गुणात्मक शिक्षणाबरोबर इतर प्रकारचे उपक्रम राबवून सक्षम विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
लहान गटात नरसेवाडी येथील सरकारी मराठी शाळेचा विद्यार्थी आदिनारायण पाटील, गुंडपी येथील सरकारी मराठी शाळेचा विद्यार्थी जयवंत गणपत पाटील व उत्कर्ष पाटील व हलशीवाडी येथील मराठी शाळेचा विद्यार्थी श्रीराम विनायक देसाई व हलशी येथील सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थी स्वराज विनायक पाटील, प्राथमिक मोठ्या गटातील सरकारी मराठा शाळा हलशी येथील शिवानी कृष्णा कोळी, स्वप्ना गणपती पाटील, वेदांत दिनेश देसाई, स्वरांजली कृष्णा पाटील व कुणाल के देसाई, माध्यमिक गटातील प्रीती कदम, सर्वज्ञ नंजीनकोड, दिव्या अंग्रोळकर, वासुदेव देसाई आदिनाथ बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
हालशी शाळेचे मुख्याध्यापक एस टी पाटील यांनी स्वागत केले, युवा स्पोर्टसच्या मिलिंद देसाई यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सहकार्य लाभले असून पुढील वर्षी देखील मोठी स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची माहिती दिली. सहशिक्षिका वैशाली माळवी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवाजी हायस्कूलचे सहशिक्षक सुदन देसाई, अनिता मठपती यांच्यासह इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!

Spread the love  आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *