

खानापूर : खानापूर तालुक्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये बाहेरील जिल्ह्यातून भरपूर असे शेळ्या मेंढ्याचे कळप आपल्या खानापूर तालुक्यात येत असतात, लाळ्या खुरकतचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडतात त्यामुळे उपाय योजना करावी, लंपी सुद्धा पूर्णपणे प्रतिबंधित नाही त्यामुळे गाई, बैलामध्ये याचे परिणाम जास्त आढळतात. त्यावरही तालुक्यातील शिल्लक गावामध्ये लसीकरण करून घ्यावे आणि या दोन्ही रोगाबद्दल शेतकरी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा आशयाचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पशुवैद्यकीय उपसंचालकाना दिले. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुळट्टी आणि लाईव्ह स्टॉक अधिकारी गुरव उपस्थित होते. याचबरोबर पशुवैद्यकीय खात्याकडून पुरविल्या जाणाऱ्या योजना सर्व नागरिकापर्यंत पोहचवा आणि तळागळातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा या विषयी ही चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त जनावरांना लसीकरण केल्याबद्दल पशूवैद्यकीय खात्याचे अभिनंदन प्रसाद पाटील यांनी केले.
यावेळी नामदेव कोलकार, कल्लपा लोहार, सुनील कोलकार, जोतिबा सुतार, सतीश बुरुड, गणेश देसाई, ओमकार कुंभार, सुरेश पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta