

खानापूर : मुळचे भंडरगाळी खानापूर व सध्या मुक्काम बाबले गल्ली अनगोळ येथील रहिवासी रामचंद्र पाटील यांनी लिहिलेल्या “पारिजात” या काव्यसंग्रहातील गीतांचे सादरीकरण मधुगंध या कार्यक्रमातून वेणुध्वनी 90.4 या रेडिओ स्टेशनवरून प्रसारित करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात तबला व टाळ मृदुंगाची साथ श्री. फोंडू सुतार व डॉ. राजेश पाटील यांची लाभली आहे. आणि संवादिनी स्वतः रामचंद्र पाटील यांनीच वाजवली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कविता त्यांच संगीत अणि त्याच गायन हे स्वतः श्री. रामचंद्र पाटील यानीच केलं आहे. सदर कार्यक्रमाला किशोर काकडे, डॉ. सुनील जलालपुरे व मनीषा सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta