Thursday , June 4 2026
Breaking News

शिवठाण हायस्कूलमध्ये ‘सायन्स ऑन व्हील’ व शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Spread the love

 

खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळ येळ्ळूर संचलित रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथे गोवा व गुलबर्गा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स ऑन व्हील व शालेय विज्ञान प्रदर्शन भव्यदिव्य वातावरणात आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्‌गुरू श्री. बळीराम मिराशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी प्रल्हाद मिराशी उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष मिराशी उपस्थित होते. यावेळी शिक्षणप्रेमी श्री. वामन मिराशी, श्री. शंकर मिराशी यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
या उपक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनी संशोधन केंद्र, पुणे तसेच बेळगाव पीपल फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. फाउंडेशनचे दत्ता भेकणे व त्यांच्या संचालक मंडळाने कार्यक्रमाला मोलाची साथ दिली. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय पिटर डिसोजा यांनी शुभेच्छा पर व्हिडिओ संदेश पाठवून सद्भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात कुंभारडा प्रायमरी स्कूल, शिवठाण प्रायमरी स्कूल, तसेच पंचक्रोशीतील अनेक शाळांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यानंतर खास निरीक्षक म्हणून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवृत्त पोलीस अधिकारी प्रल्हाद मिराशी, यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी ‘सायन्स ऑन व्हील’, आभासी विज्ञान मॉडेल्स आणि विविध प्रयोगांचे दर्शन घेत विज्ञानाविषयी जिज्ञासा व आवड वृद्धिंगत केली.
विज्ञान प्रदर्शनाचे संयोजक विलास पाटील यांनी प्रभावी संयोजन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील, चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रसाद मजूकर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘सायन्स ऑन व्हील’ व ‘वर्चुअलिटी’ कार्यक्रमाचे समन्वयक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग काकतकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. गोवा व गुलबर्गा सायन्स सेंटरचे प्रशिक्षक श्री. भूषण राऊत, अंबराया बेलगावी व लक्ष्मीकांत जमादार यांनी विविध मॉडेल्सचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्ध केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील व संयोजक विलास पाटील यांनी प्रमुख पाहुणे, प्रशिक्षक, उपस्थित मान्यवर, ज्ञान प्रबोधिनी संशोधन केंद्र, पुणे, तसेच सर्व विद्यार्थी व सहकाऱ्यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *