
खानापूर : खानापूर तालुक्यातील वरकड गावामध्ये शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास एका वाघाने गोठ्यात बांधलेल्या गाभनी गाईला ठार केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वरकड येथील शेतकरी शिद्दु रामू खरात यांनी नेहमीप्रमाणे आपली गाभनी गाय सायंकाळी गोठ्यात बांधली होती. खेड्यांमध्ये आता पक्की घरे असल्याने रात्रीच्या वेळी त्यांना कोणताही आवाज आला नाही. मात्र, रविवारी सकाळी शिद्दु खरात गोठ्यात गेले असता, त्यांची गाय मृतावस्थेत आढळली. वाघाने हल्ला करून गाईचा पोट फाडल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
या घटनेची माहिती तातडीने लोंढा वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तत्काळ वरकड येथे दाखल झाले आणि त्यांनी घटनेची पाहणी केली. यानंतर लोंडा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मृत गाईचा पंचनामा करण्यात आला आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचा व पुढील कार्यवाहीचा अहवाल वनविभाग तयार करत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta