
खानापूर : गर्लगुंजी ग्रामपंचायत आणि खानापूर तालुका पंचहमी योजना अनुष्ठान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक सरकारच्या महत्वाकांक्षी पंचहमी योजनेचे शिबिर गर्लगुंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी गर्लगुंजी ग्रामपंचायत अध्यक्ष ललिता कोलकार उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या स्वागत आणि प्रस्ताविकाने झाली.
पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी गृहलक्ष्मी, शक्ती, युवानिधी, गृहज्योती, अन्नभाग्य यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती देत महिलांना मार्गदर्शन केले.
तालुक्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत तब्बल 128.45 कोटी रुपये वितरित झाल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाने दिलेल्या पंच हमीची पूर्तता सरकारने प्रामाणिकपणे केली असून पालकमंत्री सतीश जरिकोहोली आणि एआयसीसी सचिव, माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्ठान समिती उत्कृष्ट कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सबलीकरणासाठी राबविण्यात आलेल्या पंचहमी योजनांचे लाभ सर्व पात्र महिलांनी नक्की घ्यावेत, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. गृहलक्ष्मी योजनेतून महिलांनी बचत वाढवून लघुउद्योग उभारणीची संधी निर्माण केली असून त्यातून कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावत आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिबिरात फलाणुभवी जयश्री कुंभार, निर्मला कोलेकर, मुक्ता मोरे, भाग्यश्री पाटील, संध्या पालकर यांनी आपल्या मनोगतातून पंचहमी योजनेबाबत सकारात्मक अनुभव अनुभव कथन केले आणि योजनांनी सर्वसामान्यांना होणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला अनुष्ठान समिती सदस्य प्रकाश मादार, गोविंद पाटील, इसाकखान पठाण, सोनटक्के, खानापूर डेपो मॅनेजर संतोष बेंकनकोप, एसीडीपीओ शारदा मराठे, सुपरवायझर सुनीता मडीवाल, हेस्कॉमचे जावेद नाईकवाडी, अन्न वितरण विभागाचे जांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच गर्लगुंजी ग्रामपंचायत उपाध्यक्षा रेखा कुंभार, सदस्य हणमंत मेलगे, अजित पाटील, सुरेश मेलगे, परशराम चौगुले, अनुराधा नित्तुरकर, अन्नपूर्णा बुरुड, सविता सुतार, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत स्टाफ आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन जयसिंग पाटील यांनी केले, तर समारोपानंतर पिडीओ गांधी गावडा यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta