Monday , June 1 2026
Breaking News

सरकारी हायर प्रायमरी मराठी शाळा देसूर येथे मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : सरकारी हायर प्रायमरी मराठी शाळा, देसूर येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य व शिक्षण-स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश गोरल यांनी शाळेला धावती भेट देऊन पाहणी केली. या वेळी शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्ष प्रशांत पाटील, राज्यस्तरीय अडथळा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थीनी प्राजक्ता पाटील तसेच मराठा शिक्षक संघाच्या वतीने आदर्श पुरस्कार प्राप्त भुजंग चव्हाण या तिघांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मनोज सावंत उपस्थित होते. तसेच एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष-उपाध्यक्ष चांगुना मरगळे, सदस्य मारुती लक्केबैलकर, लक्ष्मण सांबरेकर, दाजीबा गावकर, रघुनाथ सावंत, शंकर पाटील, कृषीद मुल्ला, ज्योती पाटील, नीलम पाटील, लक्ष्मी बेळगुचे, रेखा पाटील, करिष्मा बोकमूरकर उपस्थित होते.

शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निलजकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भुजंग चव्हाण यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *