
खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांचे पीए यांच्या संभाषणाची ऑडीओ क्लीप (फोनवरील संभाषण) काल एका पोर्टलने उघडकीस आणले असून याबाबत विठ्ठल हलगेकर यांच्या पीएची नार्को टेस्ट करा, अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस करणार असून अधिवेशन काळात ब्लॉक कॉंग्रेसचे शिष्टमंडळ गृहमंत्री जी. परमेश्वर साहेबांची भेट घेणार आहेत…
फोनवरील संभाषण भयावह असून यासाठीच जनतेने लाखभर मते दिली की काय? तालुक्यातील लोकांच्या मनात आता चीड निर्माण झाली आहे …
२०२३ च्या विधानसभेला जे जे भाजपाचे इच्छूक उमेदवार होते त्यांनी आता तोंडे लपवू नयेत यावर भाष्य करावे आणि मोदींच्या “ना खाऊंगा ना खाने दुंगा” या लबाड ओवीवर खानापूर भाजपाने मौन सोडावे …
ग्रामपंचायत लेवल ला ही अशी भयंकर परिस्थिती तालुक्यात निर्माण केल्याबद्द्ल तमाम खानापूर भाजप व लोकप्रतिनिधी यांचा जाहीर सत्कार करायला हारकत नाही. खानापूर भाजपाच्या नेत्यानी यासाठीच तालुकाभर फिरून मतांचा जोगवा मागितला होता का ते आता खानापूर भाजपाने जाहीर करावे.
नशीब संभाषण करणाऱ्यांनी विठ्ठल हलगेकर साहेबांनाच विधानसभेला मदत केली होती हे महत्वाचे! नाहीतर परत आमच्यावर खालच्या पातळीवरचे राजकारण करतात म्हणून धिंडोरा पिटला असता.
२५% चा प्रकार उघडकीस आणल्याबद्द्ल कृष्णा गुरव व दिपक गवाळकर यांचे जाहीर अभिनंदन. तसेच कोणतीही भीडभाड न ठेवता पोर्टलने बातमी दिल्याबद्द्ल सुद्धा त्यांचेही जाहीर अभिनंदन करण्यात आले.
सन्माननीय कृष्णा गुरव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या स्वतःच्या फोनवरून आमदार हलगेकर साहेबांच्या पीएला फोन केला होता तो सुद्धा पंचायतमध्ये बसून.
Belgaum Varta Belgaum Varta