
खानापूर : कठोर मेहनत आणि देशसेवेची जिद्द यांच्या जोरावर ताराराणी काॅलेजची कु ऋतुजा पागाद हिने भारतीय वायुसेनेत आपला दमदार प्रवेश केला आहे. कुमारी ऋतुजाच्या या यशामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव उंचावला असून काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी ती दीपस्तंभ बनली आहे .
आजवर या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यिनी भारतीय सैन्यात दाखल झाल्या आहेत. भारतीय वायुसेनेत (इंडियन एअर फोर्स) दाखल होणारी ही पहिलीच विद्यार्थिनी आहे.

विशेष म्हणजे कोणताही कोचिंग क्लास न लावता इंटरनेटचा प्रभावी वापर करून तिने हे उज्ज्वल यश संपादन केलं आहे. खडतर शारीरिक चाचण्या, आव्हानात्मक लेखी परीक्षा व मुलाखत अशा दिव्यातून गुणवत्ता शिध्द करीत कु. ऋतुजा अभिनंदनास पात्र ठरली आहे.
गेल्या एक, दोन दशका पासून मराठा मंडळातील शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने एकमेकांना भेटतांना ‘नमस्कार’ ‘गुड मॉर्निंग’ वैगरे न म्हणता “जय हिंद” असे अभिवादन करून भेटावा हा शिरस्ता मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव यांनी घालून दिला आहे आणि तो तंतोतंत पाळला जातो. विशेष म्हणजे मराठा मंडळाच्या प्रत्येक उपक्रमातून राष्ट्रसेवा, देशप्रेम हमखास अधोरेखित होते. भारतीय सेनेच्या बलिदानाचे, कृतज्ञता भावनेचे बाळकडू घेऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी देशाचे जबाबदार नागरिक बनवावेत हा त्या पाठीगचा हेतू आहे.याचच फलित म्हणजे कुमारी ऋतुजा पागद व सैन्यात आणि देशसेवेला वाहून घेणारे अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यिनी आहेत.
कुमारी ऋतुजा पागाद ही खानापूर तालुक्यातील कुसमळी-बिडी येथील श्री. परशुराम पागाद व सौ. सुवर्णा पागाद या शेतकरी दांपत्याची कन्या आहे. शेतकऱ्याच्या लेकीने मारलेली ही गगन भरारी नक्कीच खानापूर तालुक्यासाठी भूषणावह आहे. ती येत्या ती डिसेंबरला बेंगळोर येथील यलंहका एअर फोर्स येथून आपल्या सेवेला प्रारंभ करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ती कला (आर्टस्) शाखेची विद्यार्थिंनी आहे.
काॅलेजचे प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी ऋतुजा पागाद हिचा मराठा मंडळाचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते शाल व आकर्षक पुष्प हार घालून विशेष गौरव करण्यात आला. याच वेळी आईपालक सौ. सुवर्णा पागाद यांचाही सन्मान काॅलेजच्या ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीमती एस सी कणबरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव, प्रा. टी आर जाधव, प्रा. पी व्ही कर्लेकर, विद्यार्थिनी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta