
खानापूर : हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हलगा आणि परिसरात अध्यक्षांवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून जखमी झालेल्या सुनील पाटील यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हलगा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमावेळी झालेल्या क्षुल्लक कारणातून आणि शाब्दिक वादातून अध्यक्ष पाटील यांच्यावर गावातील बाळकृष्ण वसंत सुतार, अभय वामन सुतार, ओमकार अशोक सुतार, अक्षय मधुकर फटाण व आदित्य मारुती वीर यांनी अचानकपणे हल्ला केला. एकाचवेळी अध्यक्षंवर झालेल्या आल्यामुळे आणि जोरदारपणे करण्यात आलेल्या मारहाणीमुळे अध्यक्ष पाटील जागेवर कोसळले त्यानंतर गावातील काही जणांनी मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या पाटील यांना गावातील नागरिकांनी तातडीने बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्या विरोधात नंदगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून बाळकृष्ण सुतार, अभय सुतार, ओमकार सुतार, अक्षय फटाण व आदित्य वीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta