Tuesday , March 3 2026
Breaking News

चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील कापोली (ता. खानापूर) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अमानुष मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2026 अन्वये आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), (2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणी आरोपी पती अविनाश मारुती बाळेकुंद्री याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या मृत महिलेचे नाव श्रीमती किरण अविनाश बाळेकुंद्री (वय 30) असे असून त्या कापोली येथील स्वमालकीच्या किराणा दुकानात काम करत होत्या.

तक्रारीनुसार, मृत किरण या किराणा दुकानात काम करत असताना तसेच घरी आल्यानंतर काही गिऱ्हाईकांशी मोबाईलवर बोलत असल्यामुळे आरोपी पती अविनाश याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तुझे इतर कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत, असा संशय मनात धरून आरोपी वारंवार वाद घालत होता.

दि. 20 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास, कापोली येथील त्यांच्या घरात आरोपीने किरण हिच्यावर लाटण्याने, काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पाठीवर व हात-पायांवर जबर मारहाण केली. या अमानुष मारहाणीत किरण गंभीर जखमी झाली व तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची नोंद 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.45 वाजता नंदगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आर. एल. धर्मट्टी हे करत असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *