Sunday , July 26 2026
Breaking News

श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याला 29 जानेवारीपासून प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव, वैश्यवाणी युवा संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा माघ शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक 29 जानेवारी ते माघ शुद्ध चतुर्दशी रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
चार दिवसांच्या या उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी पहाटे चौघडा व काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ होणार असून सकाळी 7 ते 12 कुंकूमार्चन, सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून प्राध्यापिका सौ. शालिनी अनिल चौगुले उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 3 प.पु. श्री कलावती माता यांचे भजन. दुपारी 3 ते 4 विवेकानंद भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 4 ते 5 दीपा तबलावादन यांच्याकडून भक्ती संगीत. संध्या. 5 ते 6 सौ. यमन्नक्का भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 6 ते 7 श्री गजानन भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 7 ते 9 कीर्तनकार समर्थ भक्त सौ. दिपाली देशपांडे यांचे कीर्तन.
शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती. सकाळी 7 ते 12 लक्ष पुष्पार्चन. दुपारी 2 ते 3 प.पु. श्री कलावती माता यांचे भजन. दुपारी 3 ते 4 स्वामी विवेकानंद भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 4 ते 5 भक्ती संस्कृती भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 5 ते 6 झंकार भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 6 ते 7 श्री. श्री. वामनाश्रम स्वामीजी यांचा सत्संग. त्यानंतर पावणे कार्यक्रम होणार असून यावेळी श्री च्या नवरात्रातील देवीला परिधान केलेल्या साड्या खन यांचा जाहीर रीतीने जास्तीत जास्त मागणी करणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.
शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 7 वा. चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 11 श्री ला महाभिषेक. दुपारी 12 वा. श्री ला मिष्ठांन्न व महानैवैद्य. दुपारी 2 वा. पासून ओटी भरण्यास प्रारंभ. संध्या. 3 ते 4 वा. श्री ची पालखी प्रदक्षिणा. पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, श्री समादेवी मंदिर.
पालखी सोहळ्यानंतर रात्री आठ वाजता पावणी कार्यक्रम होणार असून श्रीच्या देवी समोरील चांदीचे नाणे व श्रीफळ तसेच देवीकडील फळ फळावळे यांचा जाहीर रीतीने जास्तीत जास्त मागणी करणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री श्री. दीपक वसंतराव केसरकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्री संस्थान शांताश्रम वैश कुलगुरू मठ हळदीपूर माजी अध्यक्ष व चंदगडचे नगराध्यक्ष सुनील सुभाष काणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष संस्थांचे
रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 ते 11. पर्यंत नवचंडीका होम करण्यात येणार असून त्यानंतर दुपारी 12 ते 3 वा. महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
तरी श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याला व सर्व कार्यक्रमांना वैश्य वाणीसमाज बांधव तसेच सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष श्री. महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वर्षा सटवाणी व सेक्रेटरी सौ. मंजुषा देवलापूरकर यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *