Monday , September 21 2026
Breaking News

विद्युत पंपांची अनामत रक्कम शेतकऱ्यांनी भरू नये

Spread the love

 

रयत संघटनेतर्फे तहसीलदार, हेस्कॉमला निवेदन ;२५ जानेवारीनंतर आंदोलन छेडणार

निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या कृषी पंपालागेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी, अक्रम सक्रम योजनेअंतर्गत, आरआर क्रमांक देण्यात आले होते. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याकडून ५० रुपये वसूल केले जात होते. आता शेतकऱ्यांच्या पंपांचे कनेक्शन जोडले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. पिके नष्ट होत आहेत. हे त्वरित थांबवावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांचे नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.२०) तहसीलदार सुरेश मुंजे आणि हेस्कॉम अभियंते सुरेश तहसीलदार यांना देण्यात आले. तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ न जोडल्यास २५ जानेवारीपासून संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनातील माहिती अशी, दिवसा १२ तास पुरवणे बंधनकारक आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झाले आहे, त्यांना अद्यापपर्यंत भरपाई देण्यात आलेली नाही, त्यासाठी त्यांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी.प्रत्येक ट्रांसफार्मर आणि पिच बॉक्स उघडे असल्याने,सुरक्षिततेसाठी बॉक्स बसवावेत. नागरिकांच्यासमस्या नोंदवण्यासाठी प्रत्येकगावात रजिस्टर ठेवावे, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
तहसीलदार आणि हेस्कॉम अभियंत्यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ पातळीवर चर्चा करून २६ हजार ६०० रुपयांच्या अनामत रकमेबाबत चार दिवसात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कल्लाप्पा कोटगे, आनंद गायकवाड, सागर पाटील, नामदेव साळुंखे, बाबासाहेब पाटील, महेश क्षीरसागर, मधुकर पाटील, महेश जनवाडे, अशोक क्षीरसागर, शिवाजी वाडेकर, कृष्णात सांगावे, बाळासाहेब खांडेकर, विजय नलवडे, सिद्धाप्पा मिरजे, दादू चौगुले यांच्यासह तालुक्यातील विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *