Tuesday , March 3 2026
Breaking News

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अजितदादा यांना श्रद्धांजली ठरेल; खानापूर समितीच्या वतीने अभिवादन

Spread the love

 

खानापूर : आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला खानापूर तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील व इतर नेत्यांच्या हस्ते अजित दादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व त्यानंतर एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला प्रस्ताविक करताना सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी स्वर्गवासी अजित दादा पवार हे स्वर्गवासी झालेत यावर विश्वास बसणे कठीण असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राबरोबरच सीमाभागावरती शोककळा पसरली आहे अशी श्रद्धांजली वाहिली.

तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी अजितदादा यांच्या निधनाने जसा पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसा तो आम्हा सीमावासीयांच्या वरती कोसळला आहे, त्यात आम्ही खानापूरची जनता सहभागी आहोत व मृतात्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना केली.

अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांनी सीमाप्रश्नाची सोडवणूक ही जर अजितदादांच्या हयातीत झाली असती तर फार चांगलं झालं असतं, पण त्यांच्या आकस्मिताने एक पोकळी निर्माण झालेली आहे आजकाल अजितदादा हे सीमाप्रश्नी समितीच नेत्यांच्या संपर्कात राहत होते, पण अचानक त्यांच्या अपघाती निधनाने फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अजितदादा यांना श्रद्धांजली असे सांगितले.

खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी अजित दादांना श्रद्धांजली वाहताना आज काल महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते शिल्लक आहेत जे सीमा प्रश्न गांभीर्याने लक्ष देऊन आहेत आणि त्यांना आस्था राहिली आहे, त्यापैकीच पहिल्या पाच मध्ये येणारे नेते म्हणजे अजितदादा होते. एक महत्त्वकांक्षी आणि धडाडीचा धुरंदर नेता म्हणून अजितदादा हे सदैव आमच्या स्मरणात राहतील अजित दादांच्या जाण्याने युवा पिढीलाही फार मोठा धक्का बसलेला आहे आणि सीमावावासीयांचं फार मोठे नुकसान झालेलं आहे, येत्या नजीकच्या काळात संघटित राहून हा सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडून घेऊया हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली असे सांगितले.

गोपाळ पाटील यांनी एक धडाकेबाज व धडाडीने निर्णय घेणार नेता म्हणून अजितदादा यांची ओळख होती. दादा स्वर्गवासी झाले असतील तरी त्यांनी आशीर्वाद रुपी सहवास आमच्या सोबत राहावा व सीमाप्रश्न सुटावा असे प्रतिपादन केले.

विलास बेळगावकर यांनी श्रद्धांजली वाहतांना त्यांना भेटलेल्या जुन्या आठवणी सांगितल्या व श्रद्धांजली वाहिली.

कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, तज्ञ कमिटीचे सदस्य प्रकाशराव चव्हाण, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, रुक्मांना झुंजवाडकर,यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

यावेळी रणजीत पाटील, डी एम भोसले रुक्‍मांना झुंजवाडकर, पुंडलिक पाटील, मरू पाटील, कृष्णा मनोळकर, जयसिंगराव पाटील, विशाल बुवाजी, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *