Monday , September 21 2026
Breaking News

हिंडलग्यातील ब्रह्मलिंगेश्वर मंदिराला दीड लाखाची मदत

Spread the love

 

श्रीक्षेत्र धर्मस्थळाकडून सहाय्य; देवस्थान पंच कमिटीकडे सुपूर्द

हिंडलगा : हिंडलगा येथील प्राचीन व श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मलिंगेश्वर मंदिराच्या विकासासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ धर्माधिकारी परमपूज्य डॉ. डी. वीरेंद्र हेगडे यांच्या मान्यतेने १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. श्रीक्षेत्र धर्मस्थळच्या वतीने हा धनादेश जिल्हा निर्देशक सतीश नाईक आणि बेळगाव जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. जी. आर. सोनेर यांनी देवस्थान पंच कमिटीला आज (ता.३०) धनादेश सुपूर्द केला.
यावेळी तालुक्याचे योजना अधिकारी श्रीराम, पर्वेक्षक संगीता, हिंडलगा ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲड. सोनेर यांनी धनादेश सुपूर्द करून मंदिराच्या जतन, संवर्धन तसेच भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी ही मदत उपयोगी ठरणार आहे. तसेच आतापर्यंत बेळगाव तालुक्यातील विविध मंदिरांना दोन कोटीहून अधिक रक्कम देणगी स्वरुपात देऊन ग्रामीण भागातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळकडून सहकार्य केले आहे. या मदतीमुळे ब्रह्मलिंगेश्वर मंदिराच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी देवस्थान पंच कमिटीच्या वतीने श्रीक्षेत्र धर्मस्थळच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *