
खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर -पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यांचे सीमांकन अर्थात सर्वे प्रक्रियेचा दुसरा टप्पा 16 आणि 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भू दाखले सहाय्यक संचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या सर्वे अंतर्गत खानापूर शहरातील सर्वे क्रमांक 41, 42, 101, 103, 104 त्याचप्रमाणे खानापूर नजीक असणाऱ्या हलकर्णी गावातील सर्वे क्रमांक 3,4,5,6,8,9,37,38 या जमिनीच्या सीमांचे मोजमाप करण्यात येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात महामार्ग लगत असलेल्या जमिनीचे मोजमाप करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता उर्वरित जमिनीच्या सीमांकनासाठी हा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे. या मोजणीसाठी तालुका भूमापक राचप्पा पटणशेट्टी आणि शासकीय भूमापक हरीश गणाचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचप्रमाणे तहसीलदार, कंदाय निरीक्षक, ग्राम प्रशासन अधिकारी, त्याचप्रमाणे पोलीस विभागाला देखील उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सार्वजनिक बांधकाम खाते त्याचप्रमाणे नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देखील सदर कारवाई संदर्भात माहिती देण्यात आली आहे त्याचप्रमाणे महामार्गालगत असणाऱ्या रहिवाशांना त्याचप्रमाणे इमारत मालकांना देखील पूर्व सूचना देण्यात येणार आहे.
खानापूर -पणजी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान स्थानिक नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते त्या अनुषंगाने सदर भूमापन प्रक्रिया पार पडली जात असून पुढील कारवाई भूमापन अहवाल आल्यानंतर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात खानापूर शहरातील शिवस्मारक ते जांबोटी सर्कल पर्यंतच्या भूमापनाचे काम पूर्ण करून नकाशा जाहीर करण्यात आला असून सध्या दुसऱ्या टप्प्यात जांबोटी सर्कल ते खानापूर कोर्ट या भागाचे भूमापन 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याची स्मारक ते मलप्रभा नदी पूलापर्यंत भूमापन पूर्ण करण्यात येणार आहे. या संदर्भात खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, या सर्वेक्षणाचे काम अत्यंत अवघड असून या कामासंदर्भात घाई गडबड करता येणार नाही त्यामुळे सदर प्रक्रिये थोडा वेळ लागणार असून शहरातील नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करावे पुढील किमान 25 ते 30 वर्षाचा विचार करून सदर रस्त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खानापुरात भव्य व नियोजित महामार्ग होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व याबाबत शहरवासी यांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. यादरम्यान नगरपंचायत व तालुका पंचायत समितीने भाडेतत्त्वावर दिलेल्या दुकान गाड्यांना दहा ते वीस वर्षाचा कालावधी झाल्याने सर्व गाड्यांचा पुन्हा लिलाव करण्यासंदर्भात नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून याबाबत लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta