Saturday , April 18 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिकांसोबत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढदिवस; शनिवारी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची माहिती

बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून शनिवारी आपला वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करणार आहेत. विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांनी गुरुवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बेनकनहळ्ळी येथील गार्डन कोर्ट हॉटेलसमोरील मैदानात हा कार्यक्रम होणार असून दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात मतदारसंघातील १५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक हे समाजाची खरी संपत्ती असून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच मला शक्ती देते, असे लक्ष्मी हेब्बाळकर वारंवार म्हणतात. त्यामुळे आपले मार्गदर्शक असलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करून, विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करून आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा करून त्या आपला वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि जीवनाविषयी उत्साह निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्ताने मनोरंजनात्मक खेळ, संवाद, सन्मान सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. म्युझिकल चेअर्स, गन-बलून शूटिंग, रिंग इन विकेट्स, अंडरवॉटर कॉइन चॅलेंज, लिंबू-चमचा शर्यत अशा दहा पेक्षा अधिक खेळांद्वारे ज्येष्ठांचे मनोरंजन करण्यात येणार असल्याचे हट्टिहोळी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी इतिहासात नोंद व्हावी अशी अभूतपूर्व विकासकामे केली आहेत. अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी असावेत, अशी भावना जनतेत आहे. गावागावांत लोक स्वतःहून “नुडिदंते नडेद ताई” (दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करणारी आई) असे फलक लावत आहेत. ग्रामस्थ त्यांना सोन्याच्या साखळ्या देऊन, साड्या अर्पण करून सन्मानित करत कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या कामामुळे मतदारसंघातील लोकांना आपण दिलेले मत सार्थ ठरल्याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

लहान असो वा मोठे, वैयक्तिक असो वा सार्वजनिक – कोणतेही काम असो, लक्ष्मी हेब्बाळकर आहेतच, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. त्या केवळ लोकप्रतिनिधी राहिलेल्या नाहीत; तर त्यांचे नाव म्हणजे लोकांचा विश्वास आणि श्रद्धा बनले आहे. संपूर्ण मतदारसंघ एक कुटुंब असल्यासारखा झाला आहे. पक्ष, जात, धर्म न पाहता लोकांच्या सुख-दुःखात साथ देण्याच्या भावनेतूनच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ नागरिकांना आपल्या घरचे वडीलधारे मानून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा आणि ते दीर्घायुषी व्हावेत, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *