खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचेकडे गोव्यापाठोपाठ आता पॉंडेचेरीची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, दिवदमन या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव म्हणून त्यांनी गेल्या वर्षभरापासून काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुन्हा पॉंडेचेरी या प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या या राजकारणातील एक प्रगतशील कार्याचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
तामि़ळनाडू व पॉंडेचेरी येथे विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी पॉंडेचेरीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे एआयसीसीने आज प्रेसला क़ळविले आहे. जेव्हापासून एआयसीसी सचिव झाल्या आहेत तेव्हा पासून कॉंग्रेस पक्ष त्यांच्यावर एका मागून एक अशा वेगवेगळ्या राज्याच्या जबाबदाऱ्या देत आहे. संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत रहायचे हाच ध्यास डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी घेतला आहे.
सध्या ३ केंद्रशासित प्रदेश व १ राज्य असा कामाचा व्याप आहे. परत केरळ, उत्तरखंड व उत्तरप्रदेश येथील संघटन सृजनचे ही काम दिले होते.
पक्ष संघटनेच्या कामामुळे जरा संघटनेचा व्याप जास्त असल्यामुळे खानापूर कडे थोडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असले तरी त्यांच्या कार्याचा व्याप अधिक वाढल्याने परिस्थिती नोकरीची बनली आहे. तरी देखील माझी आमदार या नात्याने डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा सक्रियपणे सहभाग घेऊन कार्यकर्त्यांच्या जमावतील असा आशावाद अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी ग्रामपंचायत पासून तालुका पंचायत जिल्हा पंचायत निवडणुका कर्नाटकात पुण्याची शक्यता असल्याने लवकरच यासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले जाईल असेही खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta