Tuesday , March 3 2026
Breaking News

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love

 

खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी केरळमधील कन्नूर, माहे येथे आयोजित काँग्रेसच्या विशेष पदयात्रेत सहभाग घेतला. आयएनसी पुडुचेरी आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय राजकारणात आपल्या संघटनात्मक कौशल्याने हायकमांडचे लक्ष वेधून घेणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर सध्या काँग्रेसच्या विविध देशव्यापी मोहिमांमध्ये सक्रिय आहेत. पक्ष संघटन आणि बळकटीकरणासाठी केरळ तसेच पुडुचेरी सीमाभागात आयोजित या पदयात्रेत त्यांनी सहभाग नोंदवला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून डॉ. अंजली निंबाळकर त्यांना बळ देत आहेत.
यावेळी प्रभारी गिरीश चोडणकर, कॉंग्रेसचे पीसीसी अध्यक्ष, माजी सीएम नारायणस्वामी सहित अनेक पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Spread the love  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन शाळेचे मुख्याध्यापक श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *