Monday , September 21 2026
Breaking News

माऊली अश्वाच्या रिंगण सोहळ्याने ममदापूर सोहळ्याची सांगता

Spread the love

 

आठवडाभर विविध कार्यक्रम ; परिसरातील भाविकांची गर्दी

निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) : हरिनाम सप्ताह निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आहे. येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामींच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे पूजन आणि ध्वजारोहण करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तालमीत आठवडाभर प्रवचन कीर्तन व हरिजागराचा कार्यक्रम झाला. शनिवारी (ता.२८) सकाळी काल्याचे किर्तन आणि माऊली आश्वाच्या रिंगण सोहळ्याने पाळणे सोहळ्याची सांगता करण्यात आली.
सोहळा काळात ज्ञानेश्वर माने महाराज, संत भागवत महाराज, राहुल कदम महाराज, राजू सुतार महाराज, तानाजी पाटील महाराज, मारूती लवटे महाराज डॉ.एस. डी. पन्हाळकर यांच्या प्रवचनासह कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी ५ वाजता श्री अंबिका देवालयामध्ये माऊलींच्या अश्वाचे आगमन व अश्वपुजन झाले. शनिवारी (ता.२८) सकाळी ६ वाजता राजू सुतार महाराजांचे काल्याचे किर्तन व सकाळी ८ वाजता नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा पार पडला. दुपारी १२ वाजता माऊली अश्वाचार रिंगण सोहळ्याचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील, ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील- सरकार, महारुद्र स्वामी, प्रकाश पाटील, रावसाहेब गोरवाडे, गजानन कावडकर, सुखदेव साळुंखे, मधुकर उत्तुरे, पांडुरंग हरेल, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, इम्रान मकानदार, शिरीष कमते, दीपक वळीवडे, राजू पाटील, अक्कोळ ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, राजगोंडा पाटील, चेतन स्वामी, अरुण निकाडे, बंडा पाटील, के. डी. पाटील, अजय शिंत्रे, प्रकाश गायकवाड, संजय कागे यांच्यासह परिसरातील वारकरी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *