
खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमित केलेले गाळे हटवण्यात आले आहेत. मध्यंतरी खानापूर शहरातील दोन माजी नगरसेवक पत्रकार दिनकर मरगाळे आणि विवेक गिरी यांनी आमरण उपोषण केले होते. त्यादरम्यान खानापूर तहसीलदारांनी मध्यस्थी करून त्यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर मुख्य शहरातील अतिक्रमण हटवेपर्यंत खानापूर ब्लॉक काँग्रेसने त्याचा पाठपुरावा केला होता पहिल्यांदा सदर रस्त्याचा सर्वे करण्यात आला होता परंतु त्यामध्ये देखील बऱ्याच अडचणी आल्या. प्रशासनावर दबाव आणण्यात आला परंतु या रस्ता निर्मितीसाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु ब्लॉक काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचा सर्वे पूर्ण करण्यात आला त्यानंतर नकाशा तयार झाला आणि मार्किंग करून घेण्यात आले व आता कोर्ट पासून शिवस्मारक पर्यंतचा सर्वे पूर्ण करून तेथील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या भागातील रस्ता रुंदीकरणास आता कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे.
दुसऱ्या टप्प्याची मार्केट पर्यंतचा सर्वे करण्यात येणार असून हे काम देखील ब्लॉक काँग्रेस पूर्णत्वास नेणार आहे. सध्या खानापूर शहरात अतिक्रमण हटविण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. यामध्ये नगरपंचायत तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच बांधकाम विभाग सतर्कतेने कामास लागले आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले होते की, खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे त्यामुळे या विकास कामादरम्यान कोणाचाही मुलाहिजा न राखता योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते त्याचे परिणाम आज जनतेसमोर आहेत. खानापूर शहरातील सरकारी गाळे वर्षानुवर्षे त्याच लोकांकडे आहेत. मुदत संपून देखील गाळेधारकांनी गाळे रिकामी केलेले नाहीत आणि तालुका पंचायत आणि नगरपंचायत याकडे कानाडोळा करत आहे. शहरातील अशा सर्व गाळ्यांचा लिलाव टेंडर प्रक्रियेनुसारच झाला पाहिजे त्यासाठी ब्लॉक काँग्रेस प्राधान्याने काम करेल आणि टेंडर प्रक्रिया निरपेक्षपणे राबवून शहरातील सामान्य आणि गरजू लोकांना गाळे मिळवून देतील. गाळे मिळवण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव तंत्र वापरणे जाणार नाही याची काळजी ब्लॉक काँग्रेस घेणार आहे. सामान्य जनतेवर ब्लॉक काँग्रेस कदापी अन्याय होऊ देणार नाही. शहरातील सर्व सरकारी गाळ्यांचा लिलाव हा टेंडर प्रक्रियेनुसारच व्हावा. ज्या पद्धतीने खानापूर बस डेपो मधील गाळ्यांचा लिलाव करण्यात आला आहे त्याच पद्धतीने तालुका पंचायतने या गाळ्यांच्या नव्याने प्रक्रिया राबवावी अन्यथा ब्लॉक काँग्रेस या विरोधात आवाज उठवून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी योग्य ती पावले उचलतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta