
खानापूर : नुकताच खानापूर शहरातील रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात झाली आहे. या रुंदीकरणादरम्यान अतिक्रमण केलेले सर्व गाळे प्रशासनाने काढले आहेत. खानापूर कोर्ट ते शिवस्मारक येथील जवळजवळ सहा फूट अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु शहरांतर्गत अतिक्रमणे हटवत असताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले नाही व इमारतींचा पुढचा भाग पाडण्यात आला आहे. आधीच इमारती जवळपास 40 ते 45 वर्षे जुन्या असल्यामुळे जीर्ण झाल्या आहेत त्यात काल जेसीबीद्वारे सदर इमारती पाडल्या गेल्यामुळे इमारतींचा ढाचा हलला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच ते गाळे वापर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका पंचायत, नगरपंचायतींच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊनच गाळे वापरण्यासाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta