Sunday , July 26 2026
Breaking News

बारावीच्या परीक्षेला जाण्यापूर्वीच विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू

Spread the love

 

खानापूर : बारावीची परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावात ही हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

बारावीत शिकणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी भूमिका माळंगी ही आज होणाऱ्या परीक्षेची तयारी करून घराबाहेर पडत होती. मात्र, नियतीने तिच्या आयुष्याची परीक्षा आधीच संपवली. अंघोळ उरकून घराबाहेर येत असतानाच भूमिकेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ती जागीच कोसळली. भूमिका कोसळताच पालकांनी तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. परीक्षेसाठी सज्ज झालेल्या एका उमद्या विद्यार्थिनीचा असा अचानक अंत झाल्याने बंबलवाड गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *