Friday , March 13 2026
Breaking News

भाजप जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्षपदी सदानंद पाटील

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील तरुण नेतृत्व सदानंद मारुती पाटील यांची भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण जिल्हा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

खानापूर तालुक्यातील बिदरभावी गावचे युवा उद्योजक सदानंद पाटील यांनी अल्पवयातच आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला आहे. खानापूर येथील महालक्ष्मी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी हजारो टन ऊस गाळप करून कारखान्याला पुनरुज्जीवित करण्याचे काम केले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याने हजारो कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. सदानंद पाटील यांची हीच संघटनात्मक चातुर्य आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा ओळखून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर बेळगाव ग्रामीण जिल्हा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे खानापूर तालुक्यात भाजप अधिक सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

Spread the love  महिलांसाठी मोफत सल्ला शिबिराची घोषणा! खानापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिन खानापूर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *