खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेची मासिक बैठक प्राथमिक मराठी शाळा जांबोटी येथे शनिवारी दि. ४ रोजी पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील होते. तर व्यासपिठावर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर सन् २०२२सालाचे कॅलेंडर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. बैठकीमध्ये 10, 15, 20, 25, 30 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या टाईम बाँड इन्क्रिमेंट, सुट्टीमध्ये सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या अर्जित रजा, अरियर्स बिले, मुख्याध्यापकांचा प्रभारी भत्ता, बदली प्रक्रिया, पीएसटी-जीपीटी शिक्षकांच्या समस्या अशा अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्या सोडविण्याबाबत ग्वाही दिली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर सर्व समस्या सोडविण्याबाबत क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयात सर्व स्टाफची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्यान॔तर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पिराजी पाखरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta