खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने मासिक बैठकीचे आयोजन तसेच मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचेही आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक व शोकसभा रविवार दि. 22 मार्च 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे होणार आहे.
या बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्न, संघटनात्मक बाबी तसेच आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याचबरोबर समितीच्या कार्यात मोलाचे योगदान देणारे दिवंगत नेते दीपक दळवी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, समितीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta