Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगांव शहर जिल्हा सेवा समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रा

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगांव शहर जिल्हा सेवा समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी श्री क्षेत्र नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून आणि रामानंद संप्रदाय जिल्हा बेळगांव शहर यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्याच्या निमित्ताने बेळगांव शहर बस्तवाड आरती केंद्र येथे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला मेन रोड संभाजी गल्ली राजदीप कार्यालय येथून सुरुवात होऊन गणपती मंदिर येथे सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत कुद्रेमानी, वडगांव, येळ्ळूर, पिरनवाडी, सांबरा, बामणवाडी, धामणे, खानापूर, नंदगड, व मजगाव सेवा केंद्रातून भक्तगणांनी विशेष देखावे सादर केले होते. शिवाय संप्रदायाच्या वतीने होत असलेल्या देहदान आणि अवयव दान आणि इतर सेवांचा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. यावेळी शेकडो सांप्रदायिक भक्त उपस्थित होते. कोणतेही गालबोट न लागता ही मिरवणूक पार पडली. यासाठी संप्रदायातील संग्राम सैनिकांनी आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *