Monday , May 25 2026
Breaking News

अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Spread the love

 

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी बातमी हाती आली आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले आहे. अशोक खरातच्या अश्लील कृत्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या भोंदूबाबाचे कौतुक करणारे रुपाली चाकरणरांच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यांचे भोंदूबाबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाने रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर आज शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे फोटो समोर आल्याने त्यांच्यावर राजकारणात टीकेची झोड उठवली जात होती. रुपाली चाकणकर यांच्याकडे सकाळपासूनच राजीनाम्याची मागणी केली जात होती. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांसाठी 12 मे रोजी मतदान

Spread the love  मुंबई : निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *