Sunday , August 30 2026
Breaking News

गणेबैल टोल कर्मचाऱ्यांचे आज पुन्हा टोल बंद आंदोलन

Spread the love

 

खानापूर : एनएचएआयच्या प्रोजेक्ट डायरेक्टरनी मॅनेजमेंटला गणेबैल टोलच्या कर्मचाऱ्यांचा किमान वेतन प्रश्न आज सकाळी 10.30 पर्यंत सोडवावा अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या, तरी देखील टोल चालकांची मुजोरी चालूच असल्याने आज सकाळी 11 वाजल्यापासून गणेबैल टोल कर्मचाऱ्यांनी टोल वसुली बंद केली असून आज दिवसभरात बिना टोलची वाहने ये-जा करू लागली आहेत.
गणेबैल टोलच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे अशी तेथील कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि ही मागणी रास्त देखील आहे. लेबर कमिशन आणि सरकारी नियमानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले गेले पाहिजे परंतु मोदी सरकारच्या काळात सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला आहे. मागील तीन वर्षांपासून गणेबैल टोल नाक्याचे कर्मचारी अत्यल्प कमी वेतनात काम करत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्षाचे काही नेत्यांना लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्या गाड्या टोलमुक्त आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र मात्र किमान वेतनश्रेणीपासून वंचित राहिल्यामुळे त्रासात आहेत. सध्या आमदार आणि खासदार अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही त्यामुळे निवडणुकीदरम्यान भूमिपुत्र असल्याचे सांगत मतांची याचिका करणाऱ्या लोकप्रतिनिधींना टोल नाक्यावर काम करणाऱ्या भूमिपुत्रांची समस्या सोडवायला वेळ मिळेल का? प्रश्न खानापूर ब्लॉक काँग्रेसने उपस्थित केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

देशसेवेत रमलेल्या वीर मनगटावर म. मं. ताराराणीच्या लेकींची उमटली रेशीम धाग्यांची साक्ष

Spread the love  म. मं. ताराराणी महाविद्यालयात रक्षाबंधन सोहळा अनोख्या देशभक्तीने साजरा खानापूर : म. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *