Monday , April 6 2026
Breaking News

लोंढा येथे फटाके उडवल्याच्या कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला; पाच जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील लोंढा येथे रविवारी सायंकाळी फटाके उडवल्याच्या कारणावरून दोन भावांवर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष उर्फ पीटर जॉन्सन अरेकर (राहणार चर्च गल्ली, लोंढा) व त्यांचा भाऊ रोबिन जॉन्सन अरेकर (वय 36) हे दोघेही दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता आपल्या घरासमोरील रस्त्यावर ईस्टर सणानिमित्त फटाके उडवत होते. त्यावेळी आरोपी जॉन्सन पुलामीन डिकोस्टा, विल्सन पुलामीन डिकोस्टा, नेल्सन पुलामीन डिकोस्टा, अझर कंजारी आणि विनोद भंडारी (सर्व राहणार लोंढा, ता. खानापूर) हे एकत्र जमून तेथे आले. फिर्यादी संतोष उर्फ पीटर जॉन्सन अरेकर व त्यांच्या भावाला घेरून लाथा बुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादींच्या कपाळावर डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ किरकोळ दुखापत झाली. तसेच आरोपी क्रमांक 2 याने विटेने रोबिन जॉन्सन अरेकर यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस मारून गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आर. एस. सपाटे या करीत असून जॉन्सन डिकोस्टा, विल्सन डिकोस्टा, नेल्सन डिकोस्टा, अझर कंझारी आणि विनोद भंडारी या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भा.द.वि. च्या विविध कलमान्वये (१८९ (२), १९१ (२), १२६ (२) इत्यादी) गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सह्यांची मोहिम; खानापूर तालुका समितीची बैठक मंगळवारी

Spread the love    खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *