खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाडातील (ता. खानापूर) येथे खानापूर पशु खात्याच्यावतीने विविध जातीच्या वासराचे प्रदर्शन नुकताच पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंदिगवाड ग्राम पंचायत अध्यक्षा मल्लवा नायकर होत्या.
तर प्रमुख म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन घाळी, ग्राम पंचायत सदस्य जगदिश मुलिमनी, महावीर हुलकवी, लक्ष्मण कोकडी, हुवाप्पा अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खानापूर पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. ए. एस. कोडगी यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. तर उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. तर ग्राम पंचायत अध्यक्षा मल्लवा नायकर याच्या हस्ते गायीचे पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. ए. एस. कोडगी म्हणाले की, गायीच्या वासराची शेतकऱ्यानी जोपासना चांगली करावी. वेळेत दुध द्यावे. जंतूनाशक औषध देऊन त्यांना चांगले जोपासा. त्यामुळे वासरापासुन चांगले उत्पन्न मिळते, असे सांगितले.
गंदिगवाडातील वासरांच्या प्रदर्शनात ४२ वासरांचा सहभाग होता.
यामध्ये १५ एच एफ संकरीत वासरे, १२ देशी वासरे, तर १५ म्हैशीची वासरे सहभागी झाली.
यामधील नऊ वासरांच्या मालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
तसेच उपस्थित शेतकरी वर्गाला मोफत जंतूनाशके औषधे, जीवन सत्व पावडर व वासराना लसीकरण करण्यात आले.
यावेळी गंदिगवाड पशुविकास अधिकारी एम. के. जाधव, ईरशाद सौंदती, गंगाराम गुरव गर्लगुंजी, एस. के. गणाचारी पशुअधिकारी कित्तूर, श्री. मुल्ला आदी उपस्थित होते.
या वासरांच्या प्रदर्शनात गंदिगवाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार एम. के. जाधव यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta