खानापूर : जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील रामपूर पेठ श्रीराम मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, जांबोटी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर आणि जांबोटी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष महेश गुरव उपस्थित होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात जांबोटी येथील नागरिकांनी सहभाग घेतला होता. रक्तदाब, मधुमेह, हाडांची ठिसूळता यासह आदी तपासणी नागरिकांची या शिबिरात करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. गणपत पाटील म्हणाले की, ज्या गावात नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोचत नाही अशा ठिकाणी मोफत शिबिर राबून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. गावातील नागरिकांना कोणतीही आरोग्य विषयक समस्या असो त्याचे निदान आम्ही करू, असे सांगितले.
या आरोग्य शिबिरात जांबोटी येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …