खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी शाळांतील दिवसेंदिवस घटत चाललेली विद्यार्थी पटसंख्येचा विचार करून विद्यार्थीवर्गाच्या वृध्दीच्या उद्देशाने पेशाने शिक्षिका असलेल्या मैत्रिणी श्रीमती सुमित्रा मोडक, शुभांगी पाटील, निता देसाई, सविता पाटील, नुतन कडलिकर यांनी पाच वर्षापूर्वी स्पृहा फाऊंडेशनची स्थापना केली होती. या काळात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना काळात गरिबांना किट्सचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली, तसेच फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापनदिनाचे औचित्य गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले. तेव्हा स्पृहा फाऊंडेशनचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असेच आहे, असे प्रतिपादन सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी शनिवारी बेळगांव येथील महाव्दारोड वरील रिद्धी सिद्धी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुमित्रा मोडक होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मायक्रोटेक इंजिनिअर रविंद्र कळेकर, ऑर्डनरी लेफ्टनेंट सुनिल पाटील, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन गुरूवंदना कार्यक्रमाअंतर्गत मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेजचे प्राध्यापक पी. बी. पाटील, एम. के. पाटील, प्राध्यापिका श्रीमती विनोदीनी भोसले, माधुरी गाडगीळ, सुर्यवंशी, लता अडकूरकर, हेमलता परूळेकर आदीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बेळगांव शहर व तालुक्यातील शिक्षक, सीआरपी व मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे ईशस्तवन व स्वागत विद्या पाटील यांनी केले. प्रास्ताविक शुभांगी पाटील यांनी केले. सविता पाटील यांनी अहवाल वाचन केले. नीता देसाई व सुमित्रा मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर पाटील यांनी केले. तर आभार नुतन कडलिकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सदाशिव मेलगे, प्रफूल शिखलकर, मोहन पाटील, अनिल पाटील, सुहास देशपांडे आदीनी विशेष परिश्रम घेतले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …