खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी खानापूरात माजी सैनिक संघटनेच्यावतीने व पावर अग्रो. प्रो. लिमिटेडच्यावतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीरात जय जवान जय किसान ध्येयधोरण ठेवून शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिक संघटनेने कार्यरत राहुन शेतकरी वर्गाने आत्महत्येपासुन चार हात लांब राहाणे योग्य आहे. आत्महत्यापासुन सावरण्यासाठी वेंकटेश्वर पावर अग्रो. प्रो. लिमिटेड बरोबर काम करण्याचे आवाहन केले.
तेव्हा तालुक्यातील आजी माजी सैनिकानी, शेतकरी बंधूनी माजी सैनिक संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी मार्केटिंगचे अधिकारी व्यंकटेश, यल्लापा झंगरूचे, बाळकृष्ण पाटील, कुमार सातेरी, संपत भांडगे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष अमृत पाटील, परशराम डागेकर, गणपत गावडे, मारूती पाटील, गोकुदास काणेकर, आदी उपस्थित होते.
