खानापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे वर्ष म्हणजे दहावीचे वर्ष. यात विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले तर त्यांचे आयुष्य सुलभ होते. तेव्हा दहावीच्या बोर्ड परिक्षेत चांगले गुण विद्यार्थ्यांनी मिळवावे. या उद्देशाने दहावीची पूर्व परिक्षा सोमवारी दि. 21 पासून सुरू करण्यात आली.
यावेळी खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलमध्ये दहावीच्या पूर्व परिक्षेत विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या.
दहावीच्या बोर्डपरिक्षेच्या धर्तीवर ताराराणी हायस्कूलमध्ये दहावीच्या पूर्व परिक्षेची तयारी करण्यात आली.
एकाच बेंचवर एकच विद्यार्थ्यांनी बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कॉपीचा प्रकार, चिटी, दुसर्याचे पाहून लिहिने असा कोणता प्रकार करण्यात आला नाही.
सुपरवायझर कडक तपासणी करून परिक्षेला विद्यार्थ्यांनींना बसवले आहे. त्यामुळे दहावीच्या पूर्व परिक्षेत विद्यार्थ्यांनी पास झाले तर येत्या दहावीच्या बोर्ड परिक्षेत हमखास पास होणार याची खात्री होते.
राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात दहावीपूर्व परिक्षेला सोमवारी दि. 21 पासून प्रारंभ झाला. येत्या शनिवारी दि. 26 पर्यंत ही परिक्षा चालणार आहे.
त्यानंतर लागलीच दहावीची सिरीज परिक्षा सुरू होणार. त्यानंतर मार्च महिन्यात दहावीची बोर्ड परिक्षेला प्रारंभ होणार आहे.
यावेळी वार्ताशी बोलताना ताराराणी हायस्कूल मुख्याध्यापक राहूल जाधव यांनी दहावी परिक्षेसंदर्भात संवाद साधला.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …