खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात ग्राम वास्तव्य कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश खोरवी तर अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर होते. तर कार्यक्रमाला खानापूर तालुक्याचे तहसीलदार प्रविणकुमान जैन, माजी तालुका पंचायत सदस्या पुष्पा नाईक, मंदिर ट्रस्ट कमिटीचे चेेअरमन राजाराम गावडे, तालुक्यातील विविध खात्याचे अधिकार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटोपुजन करण्यात आले.
राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा किंवा तालुका पातळीवरील अधिकारी गावात जाऊन तेथील समस्या जाणून घेण्यासाठी व त्याचे निवारण करण्यासाठी खेड्याकडे चला हा उपक्रम ग्राम वास्तव्यच्या माध्यमातून राबविला आहे. यात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. वनखात्याकडून घर बांधण्यात होत असलेला अडथळा, अॅप्रोच रस्ता, वृध्दापवेतन, पिण्याच्या पाण्याची समस्या, बस व्यवस्था, ग्राम निर्माल्य, आरोग्य तसेच विद्युत खांब आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर चिगुळे, पारवाड, मान, हुळंद, चोर्ला, तळावडे आदी गावच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावर प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुका अधिकारी, हेस्कॉम खात्याच्या अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर, कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. आर. नांद्रे, आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच पत्रकार सुनिल चिगुळकर, संजय पाटील, कृष्णा गावडे आदी उपस्थित होते.
