माजी आमदार अरविंद पाटील भाजपवासी
खानापूर : खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला. मराठी माणसांच्या मतांवर ज्यांनी आमदारकी भूषविली ते अरविंद पाटील आज वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले जात आहेत ही बाब मराठी जनतेसाठी लाजिरवाणीच म्हणावी लागेल. मागील एक वर्षापासून अरविंद पाटील हे उघडपणे भाजपच्या संपर्कात होते. कर्नाटकातील पोटनिवडणूका असो की गोव्यातील विधानसभा निवडणूक अरविंद पाटील हे उघडपणे भाजपचा प्रचार करीत होते. परंतु त्यांनी आपली भूमिका कधीच स्पष्ट केली नव्हती. ते नेहमीच खानापूर तालुक्यातील जनतेत संभ्रम निर्माण करीत होते. अखेरीस दि. 21 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बेंगळुरू येथे भाजप राज्य अध्यक्ष निलनकुमार कटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सत्तेसाठी मातृभाषेशी आणि सीमावासीयांशी गद्दारी करणारे अरविंद पाटील राष्ट्रीय पक्षाशी तरी प्रामाणिक राहतील का? असा प्रश्न मराठी जनतेतून उपस्थित होत आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …