खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचे तहसील कार्यालय आणि त्याचा आवार म्हणजे अस्वच्छतेचे साम्राज्य बनले आहे. तहसील कार्यालयाच्या बाजुला असलेल्या माळ जागेत झाडे जुडपे वाढली आहेत. त्याच ठिकाणी तालुक्यातुन तहसील कार्यालयाच्या कामासाठी आलेल्या नागरिकाकडून उघड्यावर लघुशंका केली जाते. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम तहसील कार्यालयावर तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांवरही होतो.
तेव्हा तहसील कार्यालयाकडून त्या माळ जागेवर मुतारीची सोय करावी जेणे करून नागरिकांची समस्या सुटले.
त्याचबरोबर खानापूर शहरात एका ठिकाणी ही पार्किंगची सोय नाही. त्यामुळे खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक खेड्यातील नागरीक दुचाकी वाहने, तसेच चार चाकी वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी सकाळी लावून जातात. रात्री आठ वाजता येऊन वाहने घेऊन जातात. यावर तहसील कार्यालयाकडून दक्षता घेणे गरजेचे आहे.
काही वेळी वाहने कशीही लावली जातात. त्यामुळे दिवसभर नागरिकांना याचा त्रास होतो.
तेव्हा तहसील कार्यालयाचे दंडाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन स्वच्छता व पार्किंगची व्यवस्था करण्याकडे तसेच पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी खानापूर शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकाडून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta