खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही कारणाने आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. यात शेतकरी वर्गाच्या जनावरांच्यासाठी साठा केलेल्या शेतातील गवत गंज्याना आग लागण्याचे प्रकार दिसुन येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेच सावट पसरले आहे.
असाच प्रकार रविवारी दि. २७ रोजी नंदगड (ता.खानापूर) गावच्या एपीएमसीच्या मागील बाजुस असलेल्या जागेवर आग लावली होती. ती आग जळत येऊन जवळच असलेल्या शिवारातील रामचंद्र गिरापा पाटील या शेतकऱ्याच्या गवत गंजीला लागली. त्यामध्ये त्यांचे तीन ते चार ट्रॅक्टर ट्राॅली गवत जळून खाक झाले. त्यात शेतकऱ्याचे १० ते १५ हजार रूपयाचे नुकसान झाले. शिवाय वर्षभर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याला भेडसावत आहे.
तेव्हा आगीत गवत जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदत व्हावी, अशी मागणी नंदगड भागातून होत आहे. याशिवाय गवत गंज्याना आगी लावण्याचे प्रकार कुणी करून नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …